
आज मनसेचा १४ वा वर्धापन दिन पार पडत असून यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. विष्णुदास भावे नाटयगृहात मनसेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्यभरातून सहा हजारांहून अधिक मनसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या मेळाव्यात राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटच्या मंत्र्यांना खास सूचना दिल्या आहेत. वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली आहे. पण नुसतेच वाभाडे काढू नका. सरकारनं चांगलं काम केल्यास त्यांचं अभिनंदनही करा तसंच ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत अशी ही सूचना त्यांनी मंत्र्यांना दिली आहे.
मनसेचं शॅडो कॅबिनेट
बाळा नांदगावकर – गृहखाते
नितीन सरदेसाई – वित्त आणि गृहनिर्माण
अनिल शिदोरे – जलसंपदा
अभिजित पानसे – शालेय उच्च शिक्षण
शालिनी ठाकरे – महिला बालविकास
योगेश परुळेकर – सार्वजनिक बांधकाम
अमित ठाकरे – ग्रामविकास, पर्यटन व माहिती-तंत्रज्ञान
गजानन काळे – सामाजिक न्याय
अमेय खोपकर – सांस्कृतिक कार्य