
सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाकेने विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नांवर सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. केसरी चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाकेने लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आपल मत व्यक्त केलं आहे.
23 व्या वर्षी मला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याचा इतरांना राग आहे. महाराष्ट्रात वर्षाला पाचशे एकांकिका होतात. त्यातून सातारा-सांगली किंवा कुठल्याही ग्रामीण भागातील एकही मुलगी मिळत नाही का?’ असा सवाल सुजयने विचारला आहे.
महाराष्ट्रीय व्यक्ती सर्वात जास्त वर्णभेदी आहेत, कारण वधू वरं संशोधनावेळी ते गोरी मुलगी पाहिजे, गव्हाळ रंग पाहिजे अशा अपेक्षा लिहितात. सुजय डहाकेने यावेळी असा ही आरोप केली की, व्हाईट कॉलर क्लास इतरांना कंट्रोल करत आहे. मात्र मराठी मनोरंजन विश्वातून सुजयच्या या वक्तव्यावर तीव्र आपेक्ष नोंदवली जात आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत या वादात उडी घेतली आहे. सुजयचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. मी ब्राह्मण नाहीये तरी माझ्याकडे काम आहे. असं तेजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.