शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्यातील २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. तसंच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. अतिवृष्टी, अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत करणार आहे.

राज्यातील महिला सुरक्षेसाठी सरकारचे विशेष प्रयत्न

यंदाच्या अर्थसंकल्पातमध्ये महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्टेशन उभारले जाणार असल्याची घोषणा अजित पवारांनी यावेळी केली. या पोलीस स्टेशनमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिलाच असतील, अशी महत्त्वाची घोषणा देखील अजित पवार यांनी केली. पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्याचसोबत नोकरदार मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त तृतीयपंथांसाठी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

पेट्रोल-डिझेल महागलं

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ

मुंबईत होणार मराठी भवन

मराठी भाषेच्या प्रसारासाठी मुंबईत मराठी भवन उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसंच वडाळ्यात वस्तू व सेवा कर भवनची उभारणी होणार आहे.

स्थानिकांना रोजगार

स्थानिकांना रोजगार मिळावे यासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींचा निधी

रोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा प्रयत्न करणार आहे. या शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवभोजन योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी झाली आहे. या शिवभोजन योजनेंतर्गत भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या १० रुपयांत देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *