उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यासह 7 जणांना तीस हजारी कोर्टाने १० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोर्टाने सेंगरला १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी कोर्टाने त्याला दोषी ठरवलं होतं.

कुलदीप सेंगरच्या भावाने आणि त्याच्या साथीदारांनी पीडितेच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. मात्र, ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक न करता पीडित तरुणीच्या वडिलांनाच पोलिसांनी अटक केली. पीडितेच्या तक्रारीकडे मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले.

उन्नाव पीडितेच्या वडिलांचा एप्रिल २०१८ मध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर, तत्कालिन माखी ठाण्याचे सबइन्स्पेक्टर कामता प्रसाद, तत्कालिन माखी ठाणाचे एसएचओ अशो सिंह भदौरिया, विनय शर्मा, बीरेंद्र सिंह उर्फ बऊवा सिंह, शशी प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह, जयदीप सिंह उर्फ अतुल सिंह यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *