ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांनी ट्विटरवर आपला राजीनामा पोस्ट केला होता. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे 13 मार्चला भाजपकडून राज्यसभा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे नाराज होते. कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने ते नाराज होते.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा जनतेनं संधी दिली आहे. त्यांनी जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचावलं आहे असं ही ज्योतिरादित्य यांनी म्हटलं आहे. यापूर्वी जी काँग्रेस होती ती आता नाहीये असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *