भारतात ही कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता पाच झाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी रात्री केली.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्ह्यात स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुन पूर्ण वेळ तैनात ठेवण्यात येईल.  खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीत होणारे कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. याशिवाय लोकांसाठी 104 टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुणेकरांना कोरोना संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 यावर संपर्क साधावा.

पुण्यातील एका दाम्पत्याला करोना संसर्ग झाल्याच सोमवारी सायंकाळी स्पष्ट झालं आहे. हे दांपत्य दुबईमध्ये  फिरायला गेले होते. या दांपत्याला नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल आहे. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. संपूर्ण देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 60 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्रमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे एकूण 5 रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *