
मध्य रेल्वेने करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डेक्कन, प्रगती, दुरांतो एक्स्प्रेससह एकूण २३ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेले ३९ रुग्ण आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. १८ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत या ट्रेन्स रद्द असतील.
मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
मुंबई- नागपूर अजनी एलटीटी एक्स्प्रेस
मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस
पुणे-अमरावती एक्स्प्रेस
पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेस
मुंबई-मनमाड एक्स्प्रेस
मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस
भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस
मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस
मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस
कलबुर्गी हैदराबाद इंटरसिटी एक्स्प्रेस