कमलनाथ सरकारची फ्लोअर टेस्ट आजही होऊ शकली नाही. करोना विषाणूच कारण देत मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन. पी. प्रजापती विधानसभा २६ मार्च पर्यंत स्थगित केली आहे. मात्र या निर्णया विरोधात माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने ४८ तासांमध्ये बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी दाखल केलेली ही याचिका मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांच्या विरोधातील आहे. प्रजापती यांनी करोना विषाणूचे कारण देत विधानसभा २६ मार्च पर्यंत स्थगित केली आहे. यावर भाजप आमदारांनी गदारोळही केला. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना पत्र लिहून फ्लोअर टेस्ट पुढे ढकलण्याची विनंती केली होती. राज्यपाल लालजी टंडन यांनी आपले भाषण केवळ एका मिनिटांत संपवलं. फ्लोअर टेस्ट आज होऊ शकणार नाही.

कोरोना व्हायरसचं कारण देतं राज्यपालांनी विधानसभेचं 26 मार्चपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं असं सांगितलं आहे. फ्लोअर टेस्ट घेण्यात यावा यासाठी भारतीय जनता पक्षाने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील सरकार हे अस्थिर झाले आहे, त्यामुळे करोना देखील हे सरकार वाचवू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *