
महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेले ३९ रुग्ण आहेत. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना ७ दिवस बंद ठेवण्यात निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकासने घेतला आला आहे.