भाजपचे सहयोगी सदस्य असलेले संजय काकडे यांनी माजी खासराद उदयनराजे भोसले यांच्यावरही तोफ डागली आहे. उदयनराजे यांना राज्यसभेत पाठवण्याची इतकी घाई पक्ष करेल असं वाटत नाही. उदयनराजे यांचं भाजपमध्ये मोठं योगदान नाही. ते भाजपमध्ये आले, निवडणुकीला उभे राहिले आणि पडले. त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आला नाही, असं काकडे यांनी म्हटलं.

संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपकडून राज्यसभेमध्ये जाण्याची इच्छा बोलून दाखवली. मी यावेळी सहयोगी म्हणून नव्हे तर भाजपकडून इच्छुक आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी केलेल्या कामाच्या जोरावर मला पक्ष उमेदवारी देईल याची मला खात्री आहे, असं ते म्हणाले.

राज्यसभेच्या निवडणुका जवळ आल्याने आता सर्वच पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *