24 जानेवारी 2019 रोजी जिल्हा परिषदेसह आठ पंचायत समित्या आणि जिल्हय़ातील सर्व 431 ग्रामपंचायतींमधून 3 ते 6 या वेळेत हळदीकुंकू हा कार्यक्रम एकाच वेळी घेण्यात आला होता. जिल्हय़ातून याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. 66707 महिलांना 4 लाख 242 नॅपकिन वाण म्हणून देण्यात आले होते. 30 जानेवारी 2020 रोजी लिमका बूकमध्ये नोंद झाल्याची माहिती मेलद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. या ऐतिहासिक घटनेची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी जिल्हाधिकारी दालनातील संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.