दिल्ली विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्रात जे सत्ता परिवर्तन झालं आहे, त्यामुळे देशाच्या राजकारणाला शिवसेनेने वेगळं वळण दिलं आहे, याचा परिणाम दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये दिसून येत आहेत. दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला आहे, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. ओहोटी-भरती राजकारणात सुरूच असते, परंतु फक्त आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय इतर कोणीच राज्य करू शकणार नाही. हा भाजपचा अहंकार लोक उतरवतात आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी देशद्रोहाचा मुद्दा भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, ‘देशद्रोहाची व्याख्या काय आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे, तसेच ती लोकांना मान्य करायला पाहिजे, केवळ एका व्यक्तीने देशद्रोहाची व्याख्या करणं, म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनाही ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे हे त्यांना आज दाखवून दिलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीला ६० जागा मिळाल्या असून भाजपला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत खातंही खोलता आलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *