राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला, त्यामुळे अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार? असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिल्लीत काँग्रेसने ‘आम आदमी पक्षा’शी हातमिळवणी केली होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मध्ये कोरेगाव- भीमावर आपली भूमिका स्पष्ट केली. कोरेगाव-भीमाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे, केंद्राने राज्य सरकारकडून तपास काढून घेणं योग्य नाहीच, मात्र राज्य सरकारने त्याला पाठिंबा देणं, हे त्यापेक्षा योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *