दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. राज यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातला एक नेता दगडाच्या बदल्यात दगड आणि तलवारीच्या बदल्यात तलवारीने उत्तर देईल अशी भाषा करतो आहे त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी म्हटलं की, काही लोकांची वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. काही लोक भाषणं ऐकायला आणि काही लोक पाहायला.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज ठाकरे यांनी 9 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चात नाशिक, पुणे आणि राज्यभरातील मनसैनिक सहभागी झाले होते. मोर्चानंतर आझाद मैदान येथे राज ठाकरेंची सभा झाली होती. या सभेलाही प्रचंड गर्दी दिसली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *