भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, असं आव्हान महाविकास आघाडीला दिलं होतं. त्यावर आज शरद पवार यांनी असं म्हटलं की, नुसत्या राज्यातच कशाला?, संपूर्ण देशात निवडणूक घ्या असा खोचक सल्ला पवारांनी दिला आहे. दिल्लीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर पवारांनी महाराष्ट्रातील सरकारसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या भाजपाला मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये सुनावले आहे.

एल्गार परिषद व कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरून सध्या राज्यात राजकारण सुरू आहे. याविषयी शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही शरद पवार यांनी भाष्य केलं. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. सगळ्याच विषयांवर सगळ्यांची मतं जुळतील असं नाही. मात्र, एकूण व्यवस्थित चाललं आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *