आज भाजपनं विधिमंडळ अधिवेशनात सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडला होता. मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. सावरकर गौरव प्रस्ताव हा नियमांत बसत नाही असं सांगत नाना पटोलेंनी प्रस्ताव फेटाळला आहे. अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळताच सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी विरोधकांनी ‘सावरकांची बदनामी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ शिवसेना शरम करो, अशा घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मासिकातून सावरकरांबद्दल स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर लिहून आलंय. असं आक्षेपार्ह लिखाणा केलेलं आहे. त्यामुळे शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची मागणी केली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान नाकाराता येत नाही अशी प्रतिकिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महापुरुषांच्या कामावरून वाद होऊ नये. महापुरुषांच्या कामावरुन वाद निर्माण करून समाजात गैरसमज पसरविण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार असताना सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिला गेला नाही, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *