
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेटमध्ये वीज चोरी रोखण्यासाठी नवी योजना जाहिर केली आहे. येत्या १ एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचं प्रीपेड मीटर लावणं बंधनकारक होणार आहे. वीज हवी असल्यास रिचार्ज करावे लागणार आहे. जर रिचार्ज केले नाही तर घरात वीज पुरवठा होणार नाही. मोबाइल फोनप्रमाणे आता वीजेसाठी रिचार्ज करावे लागणार आहे.
देशात टप्प्याटप्प्याने जुने मीटर काढण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटरमधून वीज सप्लाय करण्यात येणार असून यात वीजेचा दर निवडण्याचा पर्याय असणार आहे. यासाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. प्रत्येक घरात वीज मीटर लावण्यासाठी २०२२पर्यंत याचे टार्गेट आहे.