केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर निर्माणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज या निर्णयाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली आहे. या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली आहे.

त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला आयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभारण्यासंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *