माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात १९९६ ते १९९८ दरम्यानच्या दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे.

जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणतात, माझ्याविरोधात दोन खासगी तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात माझ्यावर वैयक्तिक आरोप नाहीत. या सगळ्या आंदोलनाच्या केसेस आहेत. मी कोर्टात माझी बाजू मांडली आहे मला कोर्टाकडून न्याय मिळेल. या सगळ्यामागे कोण आहे हे चांगलंच माहित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *