कर्नाटकातल्या गदगजवळच्या कोरणेश्वर संस्थान शांतीधाम मठाच्या  प्रमुख पूजारी म्हणून एका मुस्लीम व्यक्तीची नेमणूक झाली आहे. शरीफ रहमानसाब मुल्ला असं या मुस्लिम युवकाच नाव आहे. लिंगायत मठाच्या प्रमुख पुजारी म्हणून तो २६ फेब्रुवारी ला प्रमुख पुजारीपद स्वीकारणार आहे. दिवाण शरीफ मुल्ला यांच्यावर लहानपणापासूनच लिंगायत धर्माचे संस्कार झाले. मुल्ला यांचे आई-वडील बसवेश्वरांचे भक्त होते.

यापुढील सारं आयुष्य बसवण्णांच्या सामाजिक न्याय आणि बंधुभावाच्या तत्त्वांनुसार सुरु ठेवणार आहे, असं शरीफ मुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा मठ कलबुर्गी यांच्या खजुरी गावातील ३५० वर्षे पुरातन कोरानेश्वर संस्थान मठाशी संलग्न आहे. लिंगायत समाजाच्या मठांचे स्वामी सर्वसाधारणपणे संन्यासी, ब्रह्मचारी म्हणजेच साधारणपणे अविवाहित असतात. पण दिवाण शरीफ हे विवाहित आहेत. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. 10 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी दीक्षा घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *