माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मोठी आग लागली आहे. ही आग अतिशय मोठी असल्याचं समजतं आहे. दरम्यान आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीबाबत माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक अर्धवट सोडून घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, भवनामध्ये असलेली महत्त्वाची सगळी कागदपत्रं जळून खाक झाली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. सुरुवातीला इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग लागली. नंतर ती नवव्या मजल्यापर्यंत गेली. दोन्ही मजल्यावरील कर्मचाऱ्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आहे. आगीमुळं सर्व्हर रूमचं कुठलंही नुकसान झालं नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *