
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत मध्ये भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील ३४८ गुन्हे आणि मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे राज्य शासनाकडून मागे घेण्यात आले आहेत अशी माहिती दिली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान सुरु असलेल्या चर्चेत अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Maharashtra Government withdraws 348 cases out of the total 649 cases registered in Bhima Koregaon violence.
The state government also withdraws 460 cases out of 548 cases registered during Maratha reservation agitation.— ANI (@ANI) February 27, 2020
देशमुख यांनी म्हटलं की, उर्वरित गुन्हे देखील मागे घेण्याचे काम सुरु आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तेवर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.