आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु, त्यांचा सातबारा कोरा करु असं असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र, यांपैकी एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही, असं विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं आर्थिक सहाय्य करावं, अशीही मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये. केवळ 20 हजार जणांची यादी देणार आहे अशी फसवी घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार सुरु आहे. राज्यात रोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्या संदर्भात सरकारची संवेदनशीलता दिसत नाही आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी आंदोलन केलं. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *