हिंगणघाट येथील प्राध्यापिकाला एकतर्फी प्रेमातून जाळण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असून, संपूर्ण राज्यभर या घटनेविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, ‘हिंगणघाटच्या नराधमाला हैदराबादेतील घटनेप्रमाणे या मारेकऱ्याचा थेट एन्काऊंटर करावा, अशी मागणी  आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

सोलापुरात युवक काँग्रेसच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. त्या वेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, मी प्रार्थना करते की, पीडित तरुणीची प्रकृती लवकर सुधारावी. प्रशासन व घरच्यानी पीडितेला दिलासा दिला पाहिजे. तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. अशा माथेफिरू, नराधमांना कायद्याविषयीची भीतीच उरली नसल्याचे अशा घटना वारंवार घडतात. या गुन्हेगाराला तात्काळ कठोर शिक्षा देण्यासाठी पावलं उचलायला हवीत. या खटल्यांचा निकाल नव्वद दिवसांच्या आत लागला पाहिजे किंवा हैदराबादसारखं काहीतरी करा’, असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *