दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळालं आहे. मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी देखील दिल्लीत आपच सरकार अभिनंदन करताना त्यांना एक सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट करुन असं म्हटलं की, दिल्लीतील शाळांमध्ये आणि मदरशांमध्ये केजरीवाल यांनी हनुमान चालीसा शिकवायला सुरुवात करावी.

दिल्लीतील सर्व शाळा, मदरसे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये हनुमान चालीसाच्या पठणाचे आयोजन करणे आवश्यक आहे. विजयवर्गीयांनी विचारले की, बजरंगबलीच्या कृपेने आता ‘दिल्लीवासी’ मुलांनी का वंचित राहावे? कैलाश विजयवर्गीय यांनी असं ट्विट केलं आहे. दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी आपणही हनुमानाचा भक्त आहेत असं म्हटलं होतं. आम आदमी पार्टीच्या ६२ जागा मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी मंगळवार हा हनुमानाचा वार असल्याने मी दर्शनाला आलो आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. याच पार्श्वभूमीवर कैलाश विजयवर्गीय यांनी केजरीवालांना शाळा आणि मदरशांमध्ये हनुमान चालीसा शिकवण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *