सरकारी कर्मचाऱ्यांना आता दर शनिवार-रविवार सुट्टी मिळणार आहे. केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्यात यावा अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून केली जात होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयीचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली. येत्या २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे.

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा आठवडा लागू करा अशी मागणी झाली होती. त्यासाठी निवेदनं देण्यात आली होती. कामाचा वेळ 45 मिनिटं वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसंच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *