अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली आहे. 68 गावांमधील 15 हजार ३५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. 24 तासात शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहेत.

आम्ही फक्त घोषणा नाही तर कामं केली आहेत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. पहिल्या यादीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावांच्या 20 हजार शेतकऱ्यांच्या नावाची घोषणा होईल. दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर होईल. येत्या तीन महिन्याच्या कालावधीत ही योजना पूर्ण होईल. एप्रिलच्या अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *