अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट केंद्र सरकारने या ट्रस्टला १ रुपयाचे रोख दान दिलं आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट या हे पहिले दान आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये १५ सदस्य असतील. यात ९ कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. तसंच त्यात दलित सदस्यही असेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. या ट्रस्टला राजधानी दिल्लीत कार्यालयासाठी जागीही देण्यात आलीय.

या ट्रस्टमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण विश्वस्त मंडळात असतील. त्याचबरोबर जगदगुरु शंकराचार्य, ज्योतिषपीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज (अलाहाबाद), जगदगुरु माधवाचार्य स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ महाराज (उडुपी पेजावर मठ ), युगपुरुष परमानंद महाराज (हरिद्वार), स्वामी गोविंददेव गिरी महाराज (पुणे) आणि विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या) यांचा समावेश असेल. हे ट्रस्टी आणखी 5 जणांची नियुक्ती करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *