
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील हिंसाचारला गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. अमित शाह यांनी या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारावी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत अमित शहांना काही प्रश्न विचारले आहेत.
सरकारने मागच्या ७२ तासात कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे. चिथावणीखोर विधान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई का झाली नाही? निमलष्करी दलाला वेळेत का नाही बोलवलं गेलं? असा सवाल ही त्यांनी विचारला.
दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटा होता असा ही आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. भाजपा नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. दिल्ली सरकार सुद्धा शांतता राखण्यास अपयशी ठरली आहे, असं ही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.