राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपाला नाकारलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करु नका असं म्हटलं होतं. दिल्लीच्या जनतेने ते ऐकलं असून भाजपाला नाकारलं आहे. भाजपने हजारो कोटी वाटूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल पाहता मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या बाजुने कौल दिल्याचं समोर आलं आहे. यात ‘आप’ला ५३ तर भाजपला १७ जागांवर आघाडी मिळाली असल्याचं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *