निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना ३ मार्चला फासावर लटकवलं जाणार आहे. पटियाला हाऊस न्यायालयाकडून डेथ वॉरंट जारी करण्यात आलंय. ३ मार्च रोजी सकाळी ६.०० वाजता निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

2012 Delhi gang-rape case: The four convicts to be executed on 3rd March at 6 am. pic.twitter.com/neXMXtiHaK

— ANI (@ANI) February 17, 2020

निर्भयाच्या आईने या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. “आता ३ मार्च ही तारीख पुढे ढकलली जाणर नाही आणि त्या दिवशीच चारजणांना फाशी दिली जाईल अशी आशा आहे” असंही त्यांनी म्हटलं आहे.

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *