सम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री-संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी किर्तनात केलं होतं. मात्र या किर्तनाचा व्हिडीओ यूटयूबवर उपलब्ध नसल्याचा अहवाल सायबर सेलने दिला आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे इंदुरीकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

इंदुरीकर महाराज यांनी किर्तनात वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तशी तक्रार अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर आरोग्य विभागानं इंदुरीकर महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकर यांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देताना मी तसं बोललोच नाही असं इंदोरीकर म्हटलं आहे. ‘यूट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही. मी तसं वक्तव्य केलं नाही, असा दावा या उत्तरात इंदोरीकर महाराजांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *