‘सम तिथीस स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो’,’विषम तिथीस केला, तर मुलगी होते’ असं वक्तव्य निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. ओझर येथं झालेल्या किर्तनात त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली असून, या वक्तव्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात येणार आहे. इंदोरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे, गर्भलिंग निदानाबाबत जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे पीसीपीएनडीटी समितीच्या कायद्यानुसार कलम २२ चं उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.

अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पीसीपीएनडीटी च्या सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवली आहे.  जर पुरावे मिळाले तर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही पीसीपीएनडीटी च्या सदस्यांनी म्हटलं आहे.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले ?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *