मराठी भाषेचं काय होणार याची चिंता करण्याचं कारण नाही. मराठीचं कुणीही काही वाकडं करू शकणार नाही असं मुख्यमंत्री म्हटलं आहे. मराठीवर प्रेम म्हणजे इंग्रजीचा विरोध नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवूनही मराठीवर प्रेम करू शकतो. मराठी भाषा प्रचिन आहे का याचे आज पुरावे द्यावे लागतात हे दुर्दैवी आहे, असं मत मुख्यमंत्री व्यक्त केलं. कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज जगभर मराठी भाषा दिन साजरा होत आहे. आज विधान भवनात सरकारच्या वतीनं मराठी भाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. ग्रंथ दिंडीनं या सोहळ्याची सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय आमदार या सोहळ्यात सहभागी झाले होते.

मराठीचा दिवस केविलवाणेपणे साजरा करण्याची गरज नाही. मराठी भाषेच पुढे काय होणार मराठीचं चिंता करण्याची गरज नाही. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. डोके ठिकाणावर आहे का? असं इंग्रजांना ठणकावून विचारणारी मराठीच होती. असं असताना चिंताग्रस्त भावनेनं हा दिवस साजरा का करायचा,’ असं प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टिका केली. बुधवारी जेव्हा विधान परिषदेत मराठी भाषा सक्तीचं विधेयक मंजूर झालं त्या वेळी सभागृहात शांतता होती. त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल. हे सांगताना मला कुणाचा अपमान करायचा नाही असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *