छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणतात, अजित दादा इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असं वाटतंय. मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगलं होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर भाष्यही केलं. आता पहिल्यांदाच तिन्ही पक्ष एकत्र आल्याने जे काही चांगलय करायचं आहे, ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्लेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री दत्ता भरणेही उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त असंख्य शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर हजेरी लावली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्याचा कायापालट आणि सुशोभिकरण करण्यासाठी २३ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *