आनंद शितोळे

औरंगजेब सत्तावीस वर्षे आदबत होता तरीही त्याला स्वराज्य पराभूत करता आलं नाही,इथल्या माणसांनी स्वराज्याचा विचार मनात ठेवला,दोन्ही छत्रपती गेले म्हणून कुणी रडत बसला नाही ना हातपाय गाळून कुणीतरी उद्धार करायला येईल म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसला नाही,त्या माणसांना राजांचा विचार समजलेला होता.

आताच्या काळात जर आपण पुतळ्याला अभिषेक घालून , मंदिर बांधून ,शिवाजी राजांच्या आरत्या लिहून त्यांना देव करणार असलो, मखरात बसवणार असलो तर तो त्यांचा सगळ्यात मोठा पराभव असेल.

शिवाजीराजे डोक्यावर घेण्याचा नव्हे तर डोक्यात,मनात ,आचरणात आणि आकलनात असण्याचा विषय आहे. अन्यथा राजांच्या पराभवाचा कलंक आपल्या पिढीच्या माथ्यावर असेल.

#राजांनाकायवाटेल_?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *