इंदुरीकर महाराजांनी केलेलं ते विधान चुकीचं आहे. त्यांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही. पण, एका वाक्यानं ते वाईट ठरत नाहीत, एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका, असं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदुरीकर महाराजांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या प्रकरणावर भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं इंदुरीकर महाराजांनी यांनी कीर्तनात म्हटलं होतं. या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी अहमदनगरच्या PCPNDT समितीने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *