
CAA आणि NRC या काद्याविरोधात मागच्या काही दिवसांपासून आंदोलन होतं आहेत. मात्र दिल्लीतील या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे ईशान्य दिल्लीत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तब्बल एका महिन्यासाठी ईशान्य दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीतील हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
Stone pelting again starts, between two groups near Bhajanpura chowk in #NorthEastDelhi pic.twitter.com/ppf2oZ5xBT
— ANI (@ANI) February 25, 2020
काल ईशान्य दिल्लीतील अनेक ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले. तसंच दोन गटांमध्ये दगडफेक झाली. या हिंसाचारानंतर शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील शाळांमध्ये कोणत्याही वर्गाच्या परीक्षा होणार नाहीत आणि सर्व सरकारी व खासगी शाळा बंद राहतील असं उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी म्हटलं आहे.