सीएए आणि एनआरसी विरोधात बंगळुरूमध्ये एका रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीदरम्यान एका तरुणीनं व्यासपीठावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. तेव्हा खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं भाषण सुरू होतं. अमुल्या असं या मुलीचं नाव आहे. पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ओवेसी यांनी या घोषणेची कठोर शब्दामध्ये निंदा केली आहे. जेव्हा अमुल्या घोषणा देत होती. तेव्हा खुद्द ओवेसींनी धावत जाऊन तिला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवले आणि तिच्या हातातून माईक काढून घेतला. अमुल्याला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आलं.

Karnataka: Amulya (who raised ‘Pakistan zindabad’ slogan at an anti-CAA rally in Bengaluru, yesterday) & was charged with sedition, sent to 14-day judicial custody pic.twitter.com/vWS55tDZEQ

— ANI (@ANI) February 21, 2020

यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. ‘भारत जिंदाबाद था और रहेगा’, आम्ही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेचं समर्थन करत नाही असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *