अरविंद केजरीवाल यांचा इतर राजकीय नेते व पक्ष इतका द्वेष का करतात वाचा.अरविंद केजरीवाल यांचा इतर राजकीय नेते व पक्ष इतका द्वेष का करतात वाचा.

१) दिल्लीतील प्रत्येक गल्लीत मोहल्ला क्लिनिक नावानेसरकारी दवाखाने सुरू केले. त्यात पूर्णपणेमोफत औषधांसह उपचार होतात, व त्यात सुधारणा व देखरेख स्थानिक लोक ठेवतात, मोठ्या आजरा करिता त्या
क्लिनिक द्वारे शिफार केलेल्या रुग्णांचा मोठ्या हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार. अट एकच ूग्णदिल्लीचा निवासी (नोंदीत मतदार ) असावा.

२) दिल्लीतील शाळांच्या इमारती, मूलभूत सोयी टॉप क्लास शाळे प्रमाणे केल्या. शिक्षकांना पूर्ण
वेतनश्रेणी प्रमाणे व नियमित पगार (कंत्राटी मजूर पध्दत बंद).

३) दिल्लीत २४ तास वीज व  २०० युनिट पर्यंत मोफत वीज. वीज बिल ६० टक्के कमी झाले.
माणशी ३०० लिटर पाणी रोज मोफत.

४) महिलांना दिल्ली सरकार च्या बस मध्ये मोफत प्रवास.

५) दिल्लीत कोणाच्याही समोर, कोणाचाही अपघात झाला व त्या माणसाने अपघात
ग्रस्तांना मदत केली तर त्याला कुठल्याही चौकशीचा त्रास होऊ दिला जात नाही, उलटसर्वांना अशा सूचना
आहेत की, अपघात झालेल्या ठिकाणापासून सर्वात जवळचे जे हॉस्पिटल असेल तिथे त्वरित admit करावे. मग ते मोठे खासगी हॉस्पिटल असेल तरी चालेल, उपचाराचा सर्व खर्च दिल्ली सरकार करेल, उद्देश एकच अपघात ग्रस्ताचे कमीत कमी नुकसान व्हावे. प्राण वाचावे.

६) हुशार पण गरीब मुलांना सरकारी खर्चाने आयआयटी,आयआयएम, मेडिकलअभ्यासक्रमाचे मोफत व दर्जेदार कोचिंग.

७) भारतातल्या नव्हे तर संपूर्ण जगातल्या सर्वात  जास्त वाहने, वाहतूक व लोक संख्या असलेले
शहर असून देखील दिल्लीत १० वर्षापेक्षा जुनी वाहने रद्द, Odd / even day’s traffic rules,
सार्वजनिक वाहतुकीची सुरक्षा, दर्जा, प्रमाण (फेऱ्या) वाढवून प्रदूषण  कमी करण्यासाठी
प्रयत्न.

८) तुमचे काम कायदेशीर असेल व तुम्ही अर्ज केल्यापासून आठदिवसात न झाल्यास
Call to CM या सुविधेचा वापर केल्यास स्वतः सी.एम. पुढची कारवाई करतात.

उत्तम आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते, चांगली वाहतूक सुविधा, कुठल्याही सरकारी कामासाठी चकरा मारणे नाही, दुसऱ्यांना अपघाता सारख्या ठिकाणी मदत केल्यास त्रास नाही. एवढे करून ही सरकार तोट्यात नाही, कारण कमीशन खोरीपूर्ण बंद.

या हून चांगले सरकार
असू शकते का? हे आपल्या
कडे का नाही. विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *