स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी हे दोघेही मुंबई-लखनऊ विमान प्रवासात एकत्र होते. कुणाल कामरानं अर्णब यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कुणाल याच्या प्रश्नाकडे अर्णब यांनी लक्ष दिले नाही. यावेळी कुणाल कामरानं अर्णब यांना  प्रश्न विचारत, एक व्हिडीओ त्यानं ट्विटवर शेअर केला. विमानात प्रवास करताणा कुणाल कामराने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना खडे बोल सुनावले आहे.

आज सोशल मीडियावर कुणाल कामराचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होता आहे. इंडिगोच्यावतीने कुणाल कामरावर कारवाई करण्यात आली आहे. विमानात सहप्रवाशांसोबत गैरवर्तवणूक केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचं इंडिगोनं म्हटलं आहे. कुणालने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे, हे सर्व मी माझ्या हिरोसाठी केलं आहे. रोहित वेमुल्लासाठी केलं आहे, असं त्यानं म्हटलं आहे. मला नाही वाटत मी कोणताही गुन्हा केला आहे. मी हे सर्व रोहित वेमुल्लासाठी केलं. मी एक व्यक्ती सोडून सर्वाची माफी मागितली असंही कुणालने नमूद केलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *