माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी (RTI)कायद्यांतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तुकडे-तुकडे या  गॅंग विषयी प्रश्न विचारला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील तुकडे तुकडे गँग बद्दल कोणतीही माहिती नाही, असं उत्तरामध्ये म्हटलं आहे. संकेत गोखले यांनी याच अर्जाला आलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. तुकडे तुकडे गँग अस्तित्वात नाही. ती केवळ अमित शाह यांच्या संकल्पनेत आहे, असं ट्विट गोखले यांनी केलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध देशभरात होणाऱ्या आंदोलनासाठी काँग्रेस आणि ‘तुकडे तुकडे गँग’ कारणीभूत आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं होतं. जेएनयूमध्ये जेव्हा मुखवटे घातलेल्या काही गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यावेळी देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “मी जेव्हा जेएनयूमध्ये होतो तेव्हा तिथे तुकडे तुकडे गँग नव्हती,”असं म्हटलं होतं.

भाजपाच्या सामान्य नेत्यापासून ते अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणांमध्ये ‘तुकडे तुकडे गँग’हा उल्लेख वारंवार होऊ लागला आहे. याचसंदर्भात गोखले यांनी महिती अधिकार हक्काअंतर्गत अर्ज करुन ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल सरकारकडे असणारी माहिती उघड करावी अशी मागणी केली होती. मात्र या गॅंग विषयी कोणतीही माहिती नसल्यामुळे मोदी सरकार तोंडघशी पडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *