@आनंद शितोळ

प्रा.डॉ.शरद बाविस्कर यांना धमकीचे पत्र मिळाले आहे,ट्रोलिंगला तर त्यांना सतत सामोर जावं लागतंय.खरंतर कित्येक जण सरकारच्या विरोधात लिहितात मात्र या धमक्या, ट्रोलिंग अगदी मोजक्या लोकांना होत आहे.त्याची कारण समजून घ्यायला हवीत.शरद सर जेएनयू मध्ये प्राध्यापक आहेत आणि ते पीएचडी आहेत.

पण ते स्वतंत्र विचारांचे आहेत आणि भारताच्या राज्यघटनेच्या मूल्यांशी निष्ठा असणारे आणि स्वातंत्र्य प्रिय व्यक्ती आहेत.जेएनयू सारख्या विद्यापीठात असला माणूस म्हणजे तरुणांच्या मनाची, मेंदूची मशागत करणारा खरा शेतकरी.

सरकार घाबरत ते याचं स्वतःच्या मेंदूने विचार करणाऱ्या तरुणांना, कारण हेच तरुण सरकार विरोधात आवाज उठवतात, सरकारच्या बुलडोझर ला विरोध करतात.मधल्या काळात जेएनयू मध्ये झालेल्या हिंसेबद्दल खोटा प्रचार करणाऱ्या लोकांचा बुरखा फाडणारा खुलासा शरद सरांनी केल्यावर सगळ्या देशाला सत्य समजलेलं होतं.

हे सरकार आपल्याच नागरिकांच्या विरोधात का आहे याचं साधं सोपं कारण आहे. सरकारला मान डोलावणारे नंदीबैल हवे आहेत, स्वतंत्र विचारांचे नागरिक नकोत,असे नागरिक घडवण्याची क्षमता असलेला प्रज्ञावंत प्राध्यापक साहजिकच डोळ्यात खुपणार आणि त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होणार.

#StandWithJNU

#SupportJNU

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *