मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  येत्या 26 जानेवारीपासून राज्यातल्या प्रत्येक शाळेत राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचं वाचन केलं जाणार आहे. ही माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यानुसार, शाळांमध्ये परिपाठाऐवजी राज्यघटनेची प्रस्तावना वाचण्याचे आदेश देण्यात आला आहेत.

सार्वभौमत्त्व, प्रजासत्ताक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, न्याय अशा सगळ्या महत्त्वाच्या तत्वांचा राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत समावेश करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत असलेली मूल्ये रुजविण्यासाठी शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *