पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे ‘हिंदू जिना’ असल्याची टीका तरुण गोगोई यांनी केली आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. मोहम्मद अली जीना यांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताचा वापर करुन पंतप्रधान मोदी हे देखील धर्माच्या आधारे भारताचं विभाजन करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई हे तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री होते.

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात की, काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतो. पण त्यांनी स्वत:लाच पाकिस्तानच्या स्तरावर आणला आहे. नरेंद्र मोदी जिना यांच्या द्विराष्ट्रवादा दिशेने वाटचाल करत असून, भारताचे हिंदू जिना म्हणून उदयाला येतं आहेत, अशा शब्दात गोगोई यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

आम्ही हिंदू आहोत पण भारताला हिंदू राष्ट्र होताना पाहण्याची इच्छा नाही, असं गोगोई यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आसाममध्ये डिटेंशन सेंटरवर भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत. मोदी सरकारनं आसाममध्ये डिटेंशन सेंटर उभारण्यासाठी २०१८ मध्ये ४६ कोटींचा निधी जारी करण्याचा आल्याचा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *