राज्यातील काही जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागले. या निवडणुकांच्या निकालावरून शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या. कुठे शिवसेना, कुठे राष्ट्रवादी तर कुठे काँग्रेस आणि वंचित आघाडीची सरशी झाली आहे. जिल्हा परिषदांचा कौल स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचं ‘टॉनिक’ होतं. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची पीछेहाट झाली आहे. एक धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील ‘मेकअप’उतरला. ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या ‘बकवास’ थापेबाजीला कंटाळली आहे,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

नागपुरातील पराभव हा सगळ्यात मोठा दणका आहे. नागपुरात जिथे जिथे फडणवीस प्रचाराला गेले तिथे तिथे भाजप उमेदवारांचा पराभव व्हावा, यास काय म्हणावे? नागपुरात ५८ पैकी ४० जागांवर काँग्रेस – राष्ट्रवादीने विजय मिळवला हे महत्त्वाचे आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *