
@समर खडस
नाटक केलं म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली ही चौथीत शिकणारी मुले आहेत. सीएएच्या विरोधात शाळेत नाटक सादर केलं म्हणून बिदर येथे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्रातील एकही रंगकर्मी यावर काही बोलायला तयार नाही. आणि नाट्यक्षेत्राचं प्रतिनिधीत्व करणारी आणि स्वत:ला बहुदा गंमत म्हणून अखिल भारतीय म्हणवून घेणाऱ्या नाट्य परिषदेलाही यावर काही बोलावेसे वाटत नाही. आजूबाजूला काय सुरू आहे हेही समजू नये इतकाही मेंदू असलेली लोकं मराठी नाट्यसृष्टीत उरलेली नाहीत? की साध्याशा मानवी संवेदनाही नाहीशा झालेले नाटकाचे तंत्र म्हणजे काय यावरच अक्कल शिकवणाऱ्यांचेच हे क्षेत्र आहे, माहित नाही पण हे अत्यंत उद्वेगजनक आहे. बिदर पोलिसांपेक्षा मराठी नाट्यसृष्टी आणि नाट्य परिषदेसारख्या संस्था यांचाच अधिक निषेध करावा, असं मला वाटतं. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय नक्की कुणावर होतोय याचं भानच नसलेल्या मराठी नाट्य सृष्टीचा निषेध!