आज के शिवाजी – नरेंद्र मोदी या पुस्तकाचं काल प्रकाशन करण्यात आलं.  खासदार संजय राऊत यांनी या पुस्तकावर सडकून टीका केली आहे. महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवे होते, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही केवळ चमचेगिरी असल्याचा टीका राऊत यांनी केला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. यावर महाराजांच्या वंशजांची नेमकी काय भूमिका आहे? असाही प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतं आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपने हे पुस्तक मागे घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्णँ देशाचे दैवत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे मान्य आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुस्तकाची कल्पना नसावी, म्हणून त्यांना दोषी धरता येणार नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपा नेते संध्याकाळपर्यंत आपली या पुस्तकाविषयीची भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. या पुस्तकाची विक्री थांबवावी, भाजपने या पुस्तकाशी आपला काही संबंध नाही, असं जाहीर करावं, असं राऊत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *