सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ अशा आशयाचे पोस्टर मनसेने शिवसेना भवनासमोर लावला आहे. येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईत मनसेचं अधिवेशन होणार आहे. त्याआधीच मनसेनं मुंबईत पोस्टरबाजी सुरू केली आहे. राज ठाकरे यांना महाराष्ट्र धर्मसम्राट, असं संबोधण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर भगव्या रंगात असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांना उधान आलं आहे.

सेनाभवनासमोर गुरुवारी रात्री हे भव्य पोस्टर लावण्यात आलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोशल मीडीयाच्या माध्यामातून हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरच्या माध्यमातून कोणालाही डिवचण्याचा आमचा हेतू नाही, असंही देशपांडे यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *