1)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलं आहे.

2)मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

3)मनसेच्या मुंबईतील महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं लाँचिंग झालं आहे. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

4) मनसेतर्फे शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली.

5) मनसेच्या या महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

6) अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे याही यावेळी भावूक झाल्या. हा क्षण पाहून अंगावर काटा आला, अशी प्रतिक्रिया शर्मिला यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *